विवाहित असतानाही या अभिनेत्रींच्या प्रेमात संपूर्ण वेडा झाला होता गोविंदा, एकदा तर बायकोने नको त्या अवस्तेत पकडले होते रंगेहात, पळता भुई थोडी झाली होती…’पहा फोटो

Entertenment

आपल्याला माहित असेल की सुपरहिट अभिनेता गोविंदा 80 आणि 90 च्या दशकात सगळ्यात टॉपचा अभिनेता होता तसेच एकाच वेळी अनेक चित्रपट करणारा गोविंदा हा त्याकाळी मुलींमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय होता. अक्षरश बॉलिवूडच्या नायका सुद्धा गोविंदावर फिदा होत्या. त्याकाळी गोविंदावर प्रेम करणारे अनेक बरेच लोक होते.

पण विशेष बाब म्हणजे विवाहित गोविंदा सुद्धा दोन अभिनेत्रींच्या इतक्या प्रेमात पडला होता की त्याचे प्रकरण घटस्फोटापर्यंत आले होते. चला तर मग जाणून घेऊया या की त्याचे हे प्रेम प्रकरण नेमके कोणासोबत होते.

गोविंदा आणि नीलम:-

आपल्याला माहित आहे की एकेकाळी गोविंदाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. पण याकाळात केवळ चित्रपटांमुळेच नाही तर पर्सनल लाईफमुळेही गोविंदा सतत चर्चेत असे. होय, अनेक अभिनेत्रींसोबत गोविंदाचे नाव जोडले गेले. यातल्या एका प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. ती म्हणजे, गोविंदा व नीलमच्या प्रेमप्रकरणाची

गोविंदा व नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत. यापैकी 6 सिनेमे सुपरहिट झालेत. यादरम्यान गोविंदा नीलमसाठी अक्षरश: वेडा झाला होता. खरे तर पहिल्याच भेटीत तो तिच्यावर भाळला होता. पुढे तो तिच्यात गुंतत गेला अगदी सुनीताशी लग्न ठरले असतानाही.

गोविंदाचे लग्न झाले होते:-

होय, ११ मार्च १९८७ ला गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले. पण लग्न व्हायच्या काही वर्षआधी गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. एकीकडे सुनीता आणि दुसरीकडे नीलम अशी त्याची अवस्था झाली होती. त्या काळात नीलमशिवाय गोविंदाच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता अगदी होणा-या पत्नीसमोर म्हणजेच सुनीतासमोर तो नीलमची प्रशंसा करताना थकत नसे.

एवढेच नाही तर तू सुद्धा नीलमसारखी बन, असेही तो सुनीताला म्हणायला. सुनीता यावर प्रचंड चिडायची. एकदा असेच झाले. पण यावेळी रागाच्या भरात सुनीता नीलमबद्दल असे काही बोलली की, गोविंदा संतापला. कारण गोविंदा नीलमबद्दल एक शब्दही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

झाले, यावरून त्याचे व सुनीताचे कडाक्याचे भांडण झाले. इतके की, गोविंदाने सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला. पण एवढे करूनही नीलम गोविंदाची होऊ शकली नाही. गोविंदाच्या वडिलांना नीलम आवडत होती. त्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. पण गोविंदाच्या आईचा या लग्नाला कडाडून विरोध होता.

कारण गोविंदासाठी सुनीताला पसंत केले होते. आईपुढे गोविंदाचे काहीही चालले नाही. अखेर आईच्या इच्छेखातर गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले. यानंतर 2011 मध्ये नीलमने समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली.एकदा तर गोविंदाला त्याच्या बायकोने नको त्या अवस्तेत पकडले होते रंगेहात. परंतु कसेबसे कारण सांगून गोविंदाने तो विषय टाळला.

गोविंदा आणि राणी मुखर्जी:-

यानंतर सुद्धा गोविंदाचे नाव राणी मुखर्जी सोबत जोडले गेले, दोघांनीही ‘हद कर दी आपने’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि शूटिंगदरम्यान त्यांच्या अफेअरची बातमी या दोघांकडे सुद्धा येऊ लागली, त्यानंतर हे सुद्धा ऐकण्यात आले कि हे दोघेही लिव इन मध्ये राहत आहेत.

पण गोविंदाच्या या नात्याचा त्यांच्या मुलांच्या जीवनावर परिणाम होत होता. यामुळे गोविंदाची मुलगी टीना ही डिप्रेशन मध्ये गेली होती तर त्याच्या पत्नीने सुद्धा घर सोडले होते. त्यानंतर मात्र गोविंदाला तिच्याशी असलेले संबंध संपवावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *